मी मास्क वापरतोय, तुम्ही सुध्दा वापरा मोहीम पोहोचली 50 लाखांहून अधिक लोकांपर्यंत

कोल्हापूर :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या कोरोना काळातील वाढदिवसाचा विधायक पॅटर्न  तयार केला. मी मास्क वापरतो, तुम्ही सुध्दा वापरा याच माझ्यासाठी शुभेच्छा, या त्यांनी केलेल्या आवाहनाला राज्यभरातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्हिडीओतून तसेच सोशल मिडीयाद्वारे मास्कसह त्यांना शुभेच्छा देत प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल पन्नास लाख लोकांपर्यंत ही मोहिम पोहोचली. याबरोबरच कार्यकर्त्यांनी कोल्हापूरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच रस्त्यावरील कष्टकरी यांना मास्कचे वाटप सुध्दा केले.

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे दरवर्षी वह्यांच्या स्वरुपात शुभेच्छा स्विकारतात. गेल्या 13 वर्षात 65 लाखांहून अधिक वह्यांचे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमधील 14 लाख विद्यार्थ्यांना वाटप केले आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवसाला सामाजिक जाणीवेची जोड दिली. लोकांच्या सुरक्षीततेचा विचार करुन ना. पाटील यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा स्विकारल्या नाहीत. त्याऐवजी “मी मास्क वापरतोय, तुम्हीही वापरा” याच माझ्यासाठी शुभेच्छा, असे आवाहन केले. या आवाहनाला राज्यातील विविध पक्षातील मातब्बर नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी सुध्दा उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या सर्वांनी मास्क घातलेले व्हिडीओ आणि त्यासोबत संदेश सोशल मिडीयावर पोस्ट केले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याच्या मंत्रीमंडळातील ना. बाळासाहेब थोरात, ना. अशोक चव्हाण, ना. जयंत पाटील, ना. हसन मुश्रीफ, ना. दिलीप वळसे-पाटील, ना. अनिल परब, ना. जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, ना. एकनाथ शिंदे, ना. विजय वडेट्टीवार, ना. सुभाष देसाई,  ना. वर्षा गायकवाड, खा. सुप्रिया सुळे, खा. राजीव सातव, खा. संजय राऊत, ना. बच्चू कडू, ना. धनंजय मुंडे , ना. नवाब मलिक, ना. आदित्य ठाकरे, ना. उदय सामंत, ना. यशोमती ठाकूर, ना. दत्तात्रय भरणे, ना. आदिती तटकरे, खा. अमोल कोल्हे, खा. श्रीनिवास पाटील, ना. राजेश टोपे, आ. भाई जगताप, जिग्नेश मेवारी, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, इम्रान प्रतापगडी, रितेश देशमुख, यांच्यासह आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

नामदार पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सर्वसामान्य लोकांना 1 लाख मास्क वाटप करण्याचे नियोजन केले आहे. युवक काँग्रेस आणि एनएसयूआय चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कोल्हापूरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच रस्त्यावरील कष्टकरी यांना मास्कचे वाटप केले. या माध्यमातून मास्क वापरण्याबाबतचे प्रबोधन करण्यात आले. कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबीरात 500 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुढे आठवडाभर ही मोहीम सुरुच राहणार आहे. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात फळे वाटप सुध्दा केले. ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शुभेच्छा म्हणून आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे वह्या सुपूर्द केल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!