कोरोना लस घ्या आणि जेवणावर ३० टक्के सूट मिळावा
कोल्हापूर :

कोल्हापूर येथील तडका हॉटेल मध्ये एका विशेष ऑफरमुळे चर्चेत आहे. ज्या ग्राहकांनी कोरोना लस घेतली आहे त्या ग्राहकांना पार्सलवर चक्क ३० टक्के सूट देण्याची ऑफर या हॉटेलच्या मालकाने दिली आहे.

कोरोना प्रतिबंधक लस घेताना नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. लसीकरणाबाबत अनेक समज
गैरसमज निर्माण झाल्याने लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
करोना प्रतिबंधक लसीबद्दल गैरसमज दूर व्हावेत, लसीकरणाचा वेग वाढावा, यासाठी हॉटेल मालकांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, ही सूट मिळवताना ग्राहकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.
लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा मोबाइल एसएमएस दाखवणे बंधनकारक ….
सामाजिक उपक्रमांमध्ये कोल्हापूरकर कधीच मागे रहात नाहीत. कोरोनाच्या संकट काळात असे अनेक उदाहरण आहेत जी कोल्हापूरच्या सामाजिक कार्याची दखल घेतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक आणि बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. अशा काळात देखील कोल्हापूरकरांनी मदतीचा हात नेहमीच पुढे केला आहे.
कोल्हापुरातील तडका हॉटेलचे मालक संतोष सुतार व सागर सुतार यांनी आपल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर सुरू केली आहे. जर ग्राहकाने कोरोना प्रतिबंधक लस घेतली असेल त्यांना हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर ३० टक्के सूट मिळणार आहे. हॉटेल मालकाच्या या कल्पनेमुळे सध्या कोल्हापुरात या हॉटेलची जोरदार चर्चा सुरू आहे. ही सूट मिळवण्यासाठी ग्राहकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा मोबाइल एसएमएस दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लसीबद्दल गैरसमज दूर व्हावा
कोरोना प्रतिबंधक लस घेताना अनेक नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. लसीकरणाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाल्याने लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. मात्र, लसीकरणाबद्दल गैरसमज दूर व्हावेत, लसीकरणाचा वेग वाढावा, इतकाच उद्देश या ऑफर मागचा असल्याचे हॉटेल मालक सुतार सांगतात.