टीम ग्लोबल
कोल्हापूर
एप्रिलपासून रासायनिक खताचे दर गगनाला भिडले आहेत. आज दरवाढीचे परिपत्रक कंपन्यांनी विक्रेत्यांना दिले आहे.रासायनिक विविध खताचा दर कमीत कमी 250 जास्तीच्या 700 रुपये पर्यंत वाढला आहे.जिल्ह्यात खरीप आणी रब्बी हंगामात चार लाख टन खत लागते .खताची दर वाढ झाल्याने सुमारे 300 कोटींचा फटका हंगामात शेतकऱ्यांना बसणार आहे.या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या तूंन तीव्र संताप व्यक्त होत आहे.

उन्हाळी हंगाम संपत आला आहे , साखर कारखान्यांचा हंगाम संपले आहेत.ऊस भरणी चा हंगाम सुरू आहे. ऊस पिकासाठी स्फुरद प्रमाण जास्त असल्याने यामुळे डीएपी खताला मागणी आहे.मात्र डीएपी खाताचा तुटवटा झाला आहे .यामुळे शेतकरी युरियाची मागणी मोठ्या प्रमाणावर करत असून कॉम्प्लेक्स खते वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
एका महिन्यात डीएपी खताचा दर चार वेळा वाढला आहे,1330 वरून 1450 दर झाला ,पुन्हा दर वाढून 1900 रुपये झाला आहे . याबाबत एक खत कंपनी यांच्याशी संपर्क साधला असता उत्पादन खर्च वाढल्याने, व शासनाकडून अनुदान न वाढल्यास दरवाढ झाल्याचे सांगितले.डीपी खताच्या पोत्याला 140 रुपयांवरून 700 रुपये पर्यंत दर वाढ झाली आहे.
वाढीव दराचे खत अद्याप मार्केट मध्ये आलेले नाही.
केंद्रशासन विद्राव्य खते सोडून खत कंपन्यांना अनुदान देते, उत्पादन खर्च वाढल्याने , खताला अनुदान न वाढल्यास ही दरवाढ होणार आहे. या दरवाढीबाबत शेतकऱ्यांच्या तूंन तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान खत दर वाढ झाल्याने डुप्लिकेट खतांचा सुळसुळाट वाढणार आहे.खरीप,रब्बी हंगामाचा विचार करता , चार लाख टन खत जिल्ह्यासाठी लागते .खताची दर वाढ झाल्याने सुमारे 300 कोटींचा फटका हंगामात शेतकऱ्यांना बसणार आहे. दरवाढीविरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज आहे.
खताचे नाव ,जुना दर, आणि वाढलेला दर,आणी झालेली वाढ अशी …
डीएपी एनपीके – जुना दर 1200 नवीन दर 1900 दरवाढ 700 रुपये, 10:26:26एनपीके-1175-1775-600 रुपये वाढ,12:32:16 एन पी-1185-1800 -615 रुपये वाढ,
20:20:0:13 पी,पी -1100-1350-250 रुपये वाढ,15:15:15 एनपीके – 1060-1500-440 रुपये वाढ,
ही दरवाढ एका कंपनीच्या खताची असून अन्य कंपन्यांचे ही दर कमी जास्त प्रमाणात वाढ झाले आहेत .
चंद्रकांत सूर्यवंशी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद ,
पोत्याला 250 ते 500 रुपये वाढ झाली. जुन्या दराचा स्टॉक आहे. शेतकऱ्यांनी दर पाहून खते घ्यावी, शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून गरजेनुसार खते द्यावीत याचवेळी शेती परवडेल,