पुढील आदेश निघेपर्यंत जनावरांचा बाजार रद्द
करवीर :
-कोपार्डे (ता करवीर) येथील जनावरांचा बाजार कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे व जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला जमावबंदीचा आदेशानुसार रद्द करण्यात आल्यचे पत्रक ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात आली आहे.
कोपार्डे येथे दर शनिवारी जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी जनावरांचा बाजार भरतो. सध्या कोरोनाचा वाढता संसर्गामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शनिवारी आठवडी बाजार रद्द करण्यात आल्याचे पत्रक ग्रामपंचायत प्रशासनाने आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. पुढील आदेश होईपर्यत कोपार्डे जनावरांचा बाजार रद्द करण्यात आल्याची दखल सर्व शेतकरी व्यापारी यांनी नोंद घ्यावे असेही सांगण्यात आले आहे.