करवीर :
तुळशी खोऱ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करवीर पंचायत समितीचे व कोल्हापूर मार्केट कमिटीचे माजी सभापती, भोगावती कारखान्याचे माजी संचालक, शाहू शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी चेअरमन कै. बी.के.पाटील सोनाळीकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त शनिवार दि.३ एप्रिल रोजी सोनाळी (ता.करवीर) येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्त पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन एक सामाजिक उपक्रम म्हणून पाटील कुटुंबीयांच्या वतीने व संजीवन ब्लड बॅंक,
कोल्हापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. रविवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आमदार पी.एन.पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिमा पूजन कार्यक्रम साधेपणाने करण्यात येणार आहे, असे सरपंच मोहन पाटील यांनी सांगितले.
यावेळी सरपंच मोहन पाटील, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ पाटील, भरत चौगले, प्रकाश पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, कृष्णात पाटील, उमेश पाटील, पोपट पाटील, सचिन पाटील, वैभव पाटील,
वैद्यकिय अधिकारी डाॅ. श्रीधर पाटील यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.