करवीर :

साबळेवाडी ता.करवीर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेन्शन धारक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे,कागल नगरसेवक संजय चितारी, प्रमुख उपस्थित होते. माजी सरपंच,व सदस्य कृष्णात धुंदरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी लाभार्थ्यांना संजय गांधी, श्रावणबाळ ,विधवा, अपंग लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व धनादेश वाटप करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले. प्रास्ताविक कृष्णात धुंदरे यांनी केले ,आभार उपसरपंच नामदेव पाटील यांनी मानले.
यावेळी संजय गांधी समिती सदस्य विजय पोवार ,दयानंद कांबळे, निकिता निगडे , पदाधिकारी रणजीत पाटील ,संभाजी पाटील, उपसरपंच पंकज कांबळे बालिंगा, सरपंच ज्योती आंबी, उपसरपंच नामदेव पाटील, सदस्य सरदार पाटील, निशिगंधा पाटील, शितल धुंदरे ,अनिता पाटील, ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.