कोल्हापूर :

भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा संघटनमंत्रीपदी भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते नाथाजी  पाटील यांची निवड करण्यात आल्याचे पत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिले.

          भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर, भाजपा पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते  खासदार धनंजय महाडिक, मा. आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

नाथाजी पाटील यानी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, भुदरगड तालुकाध्यक्ष, आदी संघटनात्मक पदावर तसेच आकुर्डे ता भुदरगड येथील ग्रा.प च्या सरपंच व १५ वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व बीद्री सह. साखर कारखान्याचे प्रशासक म्हणूनही त्यांनी काम पाहीले आहे.

या कार्यक्रमावेळी विठ्ठल पाटील जिल्हा सरचिटणीस कोल्हापूर, भगवान काटे जिल्हाध्यक्ष  किसान मोर्चा , गारगोटी ग्रा. प. सदस्य अलकेश कांदळकर , दिपक शिरगावकर जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती ग्रामीण,पृथ्वीराज यादव जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा ग्रामीण,  वैशाली नायकवडे जिल्हा चिटणीस, सौ माधुरी कुरणे जिल्हा चिटणीस, सौ अनिता चौगले जिल्हा परिषद सदस्या, दत्ता मेडशिंगे जिल्हा चिटणीस, प्रविणसिंह सावंत,हंबिरराव पाटील करवीर तालुका अध्यक्ष, संजय पाटील कागल तालुका अध्यक्ष, विनायक परुळेकर भुदरगड तालुका अध्यक्ष, संभाजी अारडे राधानगरी तालुका अध्यक्ष,संदीप पाटील गगनबावडा तालुका अध्यक्ष, विजयकुमार रेडेकर शाहूवाडी तालुका अध्यक्ष, राजेश पाटील हातकणंगले तालुका अध्यक्ष, अनिल डाळ्या इचलकरंजी मंडल अध्यक्ष,रमेश यळगूडकर जयसिंगपूर मंडल अध्यक्ष,सुधीर कुंभार आजरा तालुका अध्यक्ष, मल्लिकार्जुन मुगेरी चंदगड  तालुका अध्यक्ष, विठ्ठल पाटील गडहिंग्लज तालुका अध्यक्ष,विशाल पाटील अध्यक्ष युवा मोर्चा करवीर तालुका, महेश मोरे, महेश पाटील प्रसिद्धी संयोजक कोल्हापूर जिल्हा, ग्रामीण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.या निवडीबद्दल नाथाजी पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन  होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!