करवीर :
सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव खाडे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि हेल्थ नेचर डेव्हलपमेंट यांचे मार्फत देण्यात येणारा यावर्षीचा आंतरराज्य विशेष शैक्षणिक सेवा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येते. विशेष शैक्षणिक व सामाजिक सेवा संवर्गातील पुरस्कार त्यांच्या कामाची दखल घेऊन देण्यात आला आहे.हा आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव येथे २८ मार्च रोजी होणार असून या फाउंडेशनने यशवंत खाडे हे सांगरुळ ता.करवीर येथील ग्रामीण भागातील शेतकरी आहेत. सांगरूळ शिक्षण संस्था ग्रुप चे संस्थापक सेक्रेटरी स्व डी.डी. असगावकर यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये सन १९९१ पासून संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच ते सांगरुळ शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे संचालक म्हणून कार्यरत आहेत तसेच शिवाजी विद्यापीठच्या सिनेट सदस्य म्हणून तीन वर्षे त्यांनी काम केले आहे. त्याच बरोबर सांगरूळ च्या पांडुरंग सहकारी सेवा संस्थेचे त्यांनी चेअरमन व पदाधिकारी ही पदेही भूषविली आहेत.
त्यांनी १९६८/६९ साली जीवन चित्र फिल्म कंपनीच्या "सुदर्शन" या चित्रपटाची निर्मिती करून कला क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. या शैक्षणिक सामाजिक सहकार व कला क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार यशवंतराव खाडे यांना देण्यात आला आहे.