कोल्हापूर :
विरोधक माझ्या तब्येतीचे कारण सांगून मी निवडणुकीला उभारणार नाही, अशा अफवा पसरवत आहेत. पण
माझी तब्येत सुधारली आहे. गोकुळच्या सत्ताधारी गटाने कायम पारदर्शी कारभार केला आहे. तसेच दूध उत्पादक सभासदांच्या हिताचा विचार केला आहे. चेअरमन म्हणून मी केलेल्या चांगल्या व स्वच्छ कारभारामुळे विरोधकांना टीका करण्यास वाव नसल्याने अफवा पसरवल्या जात आहेत. गोकुळची निवडणूक मी लढवणार आहे.
त्यामुळे दूध उत्पादक आणि दूध संस्था ठरावधारक यांनी विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.