करवीर :
वाकरे (ता.करवीर) येथील श्री कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी
संस्थेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ८२ रक्तदात्यांनी रक्तदान करून संस्थेच्या रक्तदान श्रेष्ठ दान उपक्रमास चालना दिली.
प्रारंभी जवान राजाराम सावंत, प्रदीप पाटील, वैभव पोवार यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वासराव नारायण पाटील यांची
प्रमुख उपस्थिती होती. माजी सभापती
राजेंद्र सूर्यवंशी यांनीही शिबिरास भेट दिली.
श्री कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी
संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेने महापूर व कोरोना काळात भरीव असे योगदान देत मदत कार्य, साहित्य वाटप करण्याचा प्रयत्न केला आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी कायम राखली आहे. संस्थेच्या या सामाजिक कार्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक कुंडलिक पाटील संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ पाटील, सचिव निलेश दिवसे, डे.सरपंच शारदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय पोवार, उत्तम पवार, विजय पाटील, विजय कांबळे, संदीप पाटील, जालिंदर पाटील, सागर पोवार, अशोक येरुडकर, कृष्णात पाटील, सुरेश करपे, कृष्णात पाटील, प्रा.एस.पी.चौगुले,एस.ए.पाटील, नामदेव पाटील, शिवाजी येरुडकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.