तीव्र उतारावर रस्त्यावर पडलेल्या ऑइल वरून गाडी घसरली

कोल्हापूर :

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे ता. करवीर येथे तीव्र उतारावर रस्त्यावर पडलेल्या ऑइल वरून दुचाकी गाडी घसरल्याने तरुण रस्त्यावर आपटला गेला, यामध्ये तरुणाच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच ठार झाला. एकनाथ बंडा पाटील वय २७ रा. सुळे ता. पन्हाळा असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. गाडीवर मागे बसलेला मामेभाऊ शुभम शिरगावकर वय २५ रा. कोपार्डे हा तरुण जखमी झाला, सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.करवीर पोलिसात दुपारपर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सूळे ता. पन्हाळा येथील एकनाथ बंडा पाटील हा तरुण कोपार्डे येथे आपल्या मामाच्या गावी राहायला होता. आज कोल्हापुर येथे कामावर  जाण्यासाठी गाडी नंबर एम एच ०९ डी ई ८९२७ वरून मामाचा मुलगा शुभम शिरगावकर वय २५ याला घेऊन  निघाला होता. सकाळी ९.३०  वाजता वाकरे फाट्याच्या पुढे पंपाच्या मागील बाजूस मोठ्या तीव्र उतारावर आला असता, या उतारावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर रस्त्यात ऑईल पडले होते. रस्त्यावर पडलेल्या ऑइल वरून एकनाथ यांची  गाडी घसरली, यावेळी  एकनाथ यांचे रस्त्यावर जोरात डोके आपटले,आणि त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाला, यामध्ये एकनाथ यांच्या  डोक्याला जबर मार लागल्याने,व रक्त स्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. तर बरोबर असलेला मामेभाऊ शुभम शिरगावकर हा जखमी झाला आहे. जखमी शिरगावकर याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात  आले आहे.

घटनास्थळी नातेवाईक आल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला, अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली होती, यामुळे वाहनचालकातून तीव्र संताप व्यक्त होत होता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!