‘गोकुळ’ मार्फत मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर व खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार ( स्व. आनंदराव ज्ञा. पाटील (चुयेकर) यांच्या ११ वी पुण्यतिथी साजरी)
कोल्हापूर, ता.१०: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने स्वर्गीय आनंदराव ज्ञा.पाटील (चुयेकर) यांच्या ११ व्या पुण्यतिथी पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून खासदारपदी व नामदार हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्रीपदी व नामदार प्रकाश आबिटकर यांची सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदी निवड झालेबद्दल तसेच खासदार धैर्यशील माने यांची हातकणंगले लोकसभा मतदार संघातून खासदारपदी निवड झाल्याबद्दल लाखो दूध उत्पादकांच्या व गोकुळ परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. १०/०१/२०२५ इ.रोजी गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला. यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ म्हणाले कि, म्हैस दूध हीच गोकुळची वैभव ते जोपासणे व वाढविणे गरजेचे असून जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी म्हैस दूध संकलनात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहवे. मुंबईमधील अमूलचे म्हैस दूध विक्रीचे आवाहन गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती परतून लावले आहे. गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासले असून भविष्यात दूध उत्पादकांच्या सहकार्याने वीस लाख लिटर दूध संकलनाची स्वप्नपुर्ती लवकरच पूर्ण करू. मुंबई बरोबर पुणे शहरामध्ये हि गोकुळच्या दुधाला मागणी वाढली आहे. त्यामुळे तेथेही विस्तारीकरण करण्यात येणार आहे. तसेच गोकुळचे २०-२५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर अमूलच्या कार्यक्षेत्र गोकुळचे म्हैस दूध विक्री करून असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर म्हणाले कि, सद्याच्या सहकारातील स्पर्धेमध्ये गोकुळची कामगिरी अभिमानास्पद असून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण अर्थकारणाला गती देण्याचे काम गोकुळने केले असून स्व.आनंदराव पाटील चुयेकर यांचा उद्देश साध्य झाला असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले कि,गोकुळ दूध उत्पादकाचा संघ असून महिला दूध उत्पादकांच्या उत्कर्षा मध्ये गोकुळ दूध संघाचे मोलाचे योगदान असून गोकुळने दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देऊन त्यांना न्याय देण्याचे काम केले. असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो म्हणाले कि, स्वर्गीय आंनदराव पाटील-चुयेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचे काम केले. महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून गोकुळला आपल्याला पुढे नेण्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळात अगदी मायक्रो प्लॅनिंग करून संघाच्या विविध योजना राबवून दूध उत्पादन वाढवणे,दूध विक्री वाढविणे, कमीत कमी खर्च, काटकसर व बचतीचे धोरण अवलंबने महत्वाचे आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमळा येथे गोकुळचा सहा मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असून त्यातच आणखीन चार मेगावॉट वाढविणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये म्हणाले कि, गेल्या अडीच वर्षात राबविलेल्या सभासद हिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार व माझ्या सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी यांच्या योगदानाने ‘गोकुळ’ची दिमाखात वाटचाल सुरु आहे याचा मला मनस्वी आनंद आहे असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे स्वागत माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले तर आभार संघाचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी मानले. तसेच सूत्र संचालन एम.पी.पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाला उपस्थित कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, के.डी.सी.सी.बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, संघाचे अधिकारी व महिला दूध उत्पादक व दूध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.