विरोधकांनी कितीही वैयक्तिक टीका केली तरी मी  संस्कारानेच वागणार :  राहुल पाटील यांनी जनतेची  जिंकली मने  ( शिरोली दुमालातील सभेत राहुल पाटील यांना विजयी करण्याचे माजी मंत्री शिवरकरांचे आवाहन ) 

शिरोली दुमाला : 

विरोधी उमेदवार माझ्यावर  वैयक्तिक टीका करत आहेत. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, दोन वेळा आमदार राहिले आहेत. मला वाटले नव्हते की, ते एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करतील.  त्याच ताकदीने मी उलट उत्तर देऊ शकतो, पण माझ्यावर स्व. पी.एन.पाटील यांचे संस्कार आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही वैयक्तिक टीका केली तरी मी टीका करणार नाही, संस्कारानेच वागणार असे राहुल पाटील म्हणाले. 

राहुल पाटील यांच्या संयमी उत्तराने उपस्थित जनसमुदायाने जोरदार टाळ्या वाजवून दाद दिलीच शिवाय राहुल पाटील यांनी सर्वांची मनेही जिंकली.

‘ करवीरचे आमदार – राहुल पाटील ‘ च्या घोषणेचा गजर केला. शेवटी विरोधकांना निष्ठावंत जनताच मतदानातून उत्तर देणार असेही ते म्हणाले. शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील जाहीर सभेत ते बोलत होते.  सरपंच सचिन पाटील यांनी स्वागत केले.  

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर म्हणाले,  स्व.पी.एन.पाटील म्हणजे निष्ठावंत पणाचे मूर्तिमंत उदाहरण.  कोल्हापूरचे वैभव त्यांनी वाढविले. राजीव गांधी पुतळा, अखंडीत सदभावना दौड, कितीही अमिषे आली – नुकसान झाले तरी पक्ष न बदलणे त्यांच्या पक्षनिष्टेची साक्ष देतात. काँग्रेसला सर्वस्व वाहिलेल्या नेत्यांच्या कार्याचा, निष्ठेचा वारसा तुम्हाला राहुल पाटील यांच्या रुपाने  लाभला आहे. त्यांना एवढ्या मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा की खोके वाल्यांना खोकला झाला पाहिजे. 

सभेचे अध्यक्ष गोकुळचे संचालक विश्वास पाटील, म्हणाले, आम्ही स्व. बोंद्रेदादा, पी एन पाटील यांचा प्रचार केला आता राहुल पाटील यांचा प्रचार करत आहे. या सर्व निवडणुकीचा माहोल पाहता राहुल पाटील मोठा विजय मिळविणार असल्याचे सांगितले.

 शेतकरी संघटनेचे दादू कामिरे म्हणाले, कुंभी कारखाना साडे सहाशे कोटींच्या कर्जाच्या खाईत ढकलून चंद्रदीप नरके विधानसभेत जाण्याचे स्वप्न बघत आहेत, ते  उधळून लावू. लाडक्या बहिणींना पैसे दिले म्हणून धमकवणाऱ्या या मतदारसंघातील प्रवृत्तींचा निषेध व्यक्त केला. 

 यावेळी शामराव सूर्यवंशी, शेकापचे बाबासाहेब देवकर, वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे, समृद्धी गुरव आदींची भाषणे झाली. केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पी.पाटील, बाळासाहेब खाडे, बाजार समिती संचालक  संभाजी पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, पांडुरंग पाटील, सत्यजित पाटील, सुनील पाटील,राहुल पाटील, अनिल सोलापुरे, नंदकुमार पाटील,माधव पाटील, एस.के.पाटील, बुद्धिराज पाटील, चेतन पाटील, सुभाष सातपुते, कुंडलिक कारंडे, प्रा.टी.एल.पाटील, सज्जन पाटील, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. बाजीराव पाटील यांनी आभार मानले. 

—————

भामटेतील कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश… अजित पाटील, संदीप खाडे, युवराज कृ. पाटील,भरत गो. पाटील, नामदेव शं. पाटील, रणजीत स. पाटील, कार्तिक शि. पाटील, विजय ग. तवार, अस्तिक शि. पाटील, पांडुरंग ग. तवार, सागर मा. साळोखे, विक्रम पां. पाटील, ओंकार ना. पाटील, संग्राम पां.पाटील, गजानन श्री. पाटील, उत्तम मगदूम, सचिन पाटील दाजी, अथर्व पाटील आदी भामटेतील विरोधी गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!