राहुल पाटील यांना विजयी करा : तेजस्विनी राहुल पाटील यांचे आवाहन ( वाशी, नंदवाळ, बेले, म्हाळुंगे परिसरात दौरा )
करवीर :
निष्ठावंतांचे मूर्तिमंत उदाहरणं म्हणून साहेबांचा उल्लेख होतो. आयुष्यभर जनसेवा हेच व्रत घेऊन कार्य केलेल्या स्व.पी.एन.पाटील यांच्या कार्याचा वारसा घेऊन राहुल पाटील आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, पाठबळामुळे निवडणुकीला उभे आहेत. जनसेवा व्रत समजून ते कार्य करतील. करवीरच्या गतिमान विकासासाठी राहुल पाटील यांना विजयी करा, असे आवाहन सौ. तेजस्विनी राहुल पाटील यांनी मतदारसंघातील युवती, महिलांशी व ग्रामस्थांशी संवाद साधतानना केले.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. तेजस्विनी राहुल पाटील यांनी घर टू घर पिंजून काढत आहेत. करवीर तालुक्यातील वाशी, नांदवाळ, बेले, म्हाळुंगे परिसरातील घरोघरी जाऊन युवती, महिलांना भेटून राहुल पाटील यांच्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हात चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. गावागावांत युवती, महिला तेजस्विनी पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करून आम्ही राहुल पी. एन.पाटील यांनाच मत देण्याचा मनोदय व्यक्त करत आहेत.