विजयाचा गुलाल मीच उचलणार : राहुल पाटील
(वाकरे येथील जाहीर सभेत व्यक्त केला विश्वास, सभेला गर्दी)
करवीर :
स्व.पी.एन. पाटील यांचे कार्य, त्यांनी जोडलेली माणसे, निष्ठावंत कार्यकर्ते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचे नेतृत्व व महाविकास आघाडीची मोट, आपल्या सर्वांचे आशीर्वाद व साथीने आपला विजय निश्चित आहे. विकासाचे व्हिजन घेऊन वडिलांच्या वाटेवर पुढे जाणार आहे. या निवडणुकीत विजयाचा गुलाल मीच उचलणार, असा ठाम विश्वास राहुल पाटील यांनी वाकरे (ता. करवीर) येथील जाहीर सभेत केला. अध्यक्षस्थानी जयसिंग पाटील होते.
उबाठाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, स्व.पी.एन. यांनी प्रचंड विकासकामाबरोबर अनेकांना मदत केली पण कधी केले म्हणून सांगितले नाही. याऊलट विरोधक १० चे १०० करून सांगत सुटतात. राहुल पाटील यांचे वादळ सुटले आहे. विजयाचा पहिला निकाल राहुल पाटील यांच्या रूपाने लागेल.
गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे सुनावले.
पै.अशोक माने म्हणाले, विरोधक नुरा कुस्ती खेळणारे आहेत. राहुल पाटील यांच्या तुफान गर्दीच्या सभा पाहून विरोधकांना धडकी भरली आहे.
सागर कश्यप म्हणाले, स्व.पी.एन.पाटील यांच्याकडे काम घेऊन गेल्यावर गटतट न विचारता गावात आम्हाला १५ लाख निधी दिला. हा निधी साहेबांचे निधन होण्यापूर्वीचा शेवटचा निधी होता तो आपल्या गावाला मिळाला. त्याचवेळी जनतेची कदर करणाऱ्या या नेत्याने मनात घर केले. गाढवाला गुळाची चव काय म्हणीप्रमाणे गद्दारांना निष्ठा काय कळणार असा टोला हाणला.
आमच्या भोगावती पट्ट्यात जॉन जॉनी जनार्दन नावाचं टोळकं आहे. खोक्याला भुलून ही दोनच माणसे तिकडे गेली आहेत. यांचे मागे कोणीही नाही. संघटनेचे सर्व कार्यकर्ते राजू शेट्टींच्या आदेशानुसार राहुल पाटील यांच्यासोबतच आहे असे स्वाभिमानीचे विठ्ठल महाडेश्वर यांनी सांगताच टाळ्यांचा गजर झाला.
भारती पवार, वसंत पाटील, डी.जी.भास्कर, बुद्धीराज पाटील, किरण पाटील, दादू कामीरे, बाजीराव देवाळकर, अविनाश पाटील, सुरज पाटील, सुरेश करपे, बबलू पाटील आदींची भाषणे झाली. बाळासाहेब खाडे, अमर पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, कृष्णात तोरस्कर, शिवाजी तोडकर, भगवान पाटील, के.डी. माने, राऊसो पाटील, विजय पोवार, सागर सूर्यवंशी, संभाजी कांबळे, बबन कांबळे, सुभाष पाटील यांचेसह कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.