राहुल पाटील विरोधकांना चितपट करणार : कळेतील सभेत सतेज पाटील गरजले  ( पन्हाळ्यातील कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, स्व. पी एन. पाटील यांच्या आठवणीने संजय पवारांना अश्रू अनावर  ) 

कोल्हापूर   :   स्व. बोन्द्रेदादा, स्व.पी.एन.पाटील यांच्याकडून राहुल यांना राजकीय बाळकडू मिळाले आहेत. त्यांनी जि.प. अध्यक्ष म्हणून जिल्हाभर ठसा उमटविला आहे. विकासाची दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व आहे.आताच गगनबावड्यातून मताधिक्य देण्याचे ठरवून आलो आहे. सभेची गर्दी पाहता करवीरचा निकाल स्पष्ट होतोय. त्यामुळे राहुल पाटील विरोधकांना चितपट करणार, हे अंतिम असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम. सतेज पाटील यांनी सांगितले. 

काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ कळे येथे पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विलास पाटील होते. सभेने  गर्दीचा उच्चांक गाठला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह व जोश प्रचंड होता. सतेज पाटील, राहुल पाटील यांच्या विजयाचा एकच जयघोष होता. खास.छत्रपती शाहू महाराज यांनी राहुल पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले. 

आम. सतेज पाटील पुढे म्हणाले, पायाला भिंगरी बांधून कामाला लागा. तुम्ही फिल्डिंग टाईट ठेवा, मॅच जिंकायला मागे पडत नाही. पन्हाळ्याच्या विकासासाठी मी व राहुल पाटील सक्षम आहोत. अमिषाला बळी पडू नका. कुणाच्या धमक्यांना अजिबात  घाबरू नका, तुमच्या सगळ्या संस्थांच्या मागे बंटी पाटील खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास दिला. 

राहुल पाटील म्हणाले, स्व.पी.एन.पाटील यांनी पन्हाळ्यातील जनतेची होणारी गैरसोय पाहून तहसील कार्यालय शाहूवाडीतून पन्हाळ्यात आणले. धामणीच्या कामाला गती दिली. गावागावात विकासनिधी दिला. वडिलांचे स्व.पी.एन.पाटील ही कोल्हापूरची अस्मिता आहे. त्यांच्या माघारी सर्वांनी जबाबदारी पार पडायची आहे.   स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाताचे बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले. 

उबाठा जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, राहुल पाटील वडिलांचे घेऊन फिरतात, तुम्ही कुणाचे फोटो घेऊन फिरता, बाळासाहेबांचे? तुम्हीही तुमच्या वडिलांच्या नावे मते मागा असा सवाल चंद्रदीप नरकेंना करत  गद्दारांना माफ करणार नसल्याचा इशारा दिला. तसेच यावेळी निष्ठावंत स्व.पी.एन. पाटील यांच्या आठवणीना उजाळा देताना , त्यांना अश्रू अनावर झाले. 

विलास पाटील (कळे) म्हणाले, परखंदळे येथील ४५ एकर गावठाणमधील २७ एकर गावठाण उद्योगपती अदानीला दिले आहे. उद्योग उभारायचा होता तर गुजरातच्याच माणसाला कां जमीन. महाराष्ट्रात कोणी उद्योजक नाही का? याला जबाबदार कोण? याचे उत्तर महायुतीने दिले पाहिजे असे आव्हान दिले. पन्हाळ्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

———————————–

पडसाळी घाटाचा प्रश्न सोडविणार..

विरोधकांची अडीच वर्षे सत्ता होती, त्यांनी या प्रश्नावर का तोंड उघडले नाही. निवडणुकीच्या तोंडावर काय तरी चुकीची वक्तव्ये करत सुटले आहेत. पडसाळी घाटाचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार तसेच पन्हाळ्याच्या सर्वागीण विकासासाठी कटीबद्ध आहोत. यासाठी राहुल पाटील हे युवा नेतृत्व विधानसभेत पाठवा असे आवाहन केले. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!