विकासाचे व्हिजन असलेल्या राहुल पी. एन. पाटील यांना विजयी करा : सौ. तेजस्विनी राहुल पाटील ( वाळोली, किसरूळ, पाटपन्हाळा, बाजारभोगाव भागात दौरा )
पन्हाळा :
आयुष्यभर जनसेवा हेच व्रत घेऊन कार्य केलेल्या स्व.पी.एन.पाटील यांचे वारसदार राहुल पाटील यांना विजयी करून विधानसभेत पाठवा. स्व. पी.एन. पाटील यांनी मतदारसंघातील गावात निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. स्व. साहेबांचा समृद्ध वारसा राहुल पाटील त्याच ताकदीने पुढे नेतील, जनसेवेत ते कोठेच कमी पडणार नाहीत. विकासाचे व्हिजन असलेल्या राहुल पी. एन. पाटील यांना विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ. तेजस्विनी पाटील यांनी केले.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारानिमित्त तेजस्विनी पाटील ‘ घर टू घर’ पिंजून काढत आहेत. मतदारसंघातील युवती, महिलांशी व ग्रामस्थांशी संवाद साधताना,
घरोघरी जाऊन युवती, महिलांना भेटून राहुल पाटील यांच्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हात चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.
तेजस्विनी पाटील घर टू प्रचार करत असल्याने त्यांचा धडाकेबाज प्रचार पाहून गावोगावी महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तेजस्विनी पाटील यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. मोठ्या दिमाखात महिला त्यांचे स्वागत करत असून आम्ही भगिनी राहुल पाटील यांच्यासोबत असून मताच्या रूपात त्यांना विजयी करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
तेजस्विनी पाटील यांनी पन्हाळा तालुक्यातील वाळोली, पोहाळे, पोहाळवाडी, काऊरवाडी, किसरूळ मुगडेवाडी, पाटपन्हाळा, बांद्रेवाडी, पोर्ले, बाजारभोगाव गावात घर टू घर प्रचार करत युवती, महिलांची व ग्रामस्थांची मने जिंकली. गावागावांत युवती, महिला तेजस्विनी पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करून आम्ही राहुल पी. एन.पाटील यांनाच मत देण्याचा मनोदय व्यक्त करत आहेत. प्रचार दौऱ्यात महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.