जनसेवेसाठी केंद्रात राहुल.. करवीरमध्ये राहुल.. : खासदार प्रणिती शिंदे ( निगवे दुमाला येथील मेळाव्यात ‘ आम्ही बहिणी राहुल पाटील यांच्यासोबत ‘ चा नारा घुमला)
कोल्हापूर :
वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून केवळ आणि केवळ जनसेवेचा वसा घेऊन केंद्रात ज्या पद्धतीने राहुल गांधी झटत आहेत, त्या पद्धतीने करवीरमध्ये आईवडिलांच्या निधनाचे दुःख पोटात घालून जनसेवेसाठी राहुल पाटील उभे आहेत. आता तुम्हीच त्यांच्या आई, बहिणी आहात. तुमच्या आशीर्वादाची त्यांना गरज आहे, असे भावनिक आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी करताच उपस्थित सर्व महिला भावुक झाल्या.
महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार राहुल पी. पाटील यांच्या प्रचारार्थ निगवे दुमाला (ता.करवीर) येथील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. राहुल पाटील व तेजस्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास महिलांची मोठी गर्दी झाली होती. ‘ यावेळी ‘ आम्ही बहिणी राहुल पाटील यांच्यासोबत ‘ नारा घुमला.
खासदार शिंदे पुढे म्हणाल्या, अडीच वर्षात सरकारला बहिणी आठवल्या नाहीत. लहान मुली, महिलांवरील अत्याचार दिसले नाहीत. तेथे वरपासून खालपर्यंत महिलांना कमी लेखणारी मानसिकता आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिंदेसेना सरकारला बहिणी आठवायला लागल्या. पण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आम्हाला बहिणींची सुरक्षितता महत्वाची आहे. जिजाऊ – सावित्रीच्या लेकींची मते पैशाने विकत घेणाऱ्यांना बहिणीच धडा शिकवतील, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुतीवर केली.
मतांच्या रूपाने राहुल पाटील यांना विजयी करून स्व.पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहूया. देशात काँग्रेसने महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन महिलांचा सन्मान केला. महिला व गरिबांसाठी अन्नधान्य , संजय गांधी, रमाई आवास सारख्या अनेक योजना काँग्रेसने आणल्या. विरोधकांनी कितीही पैशाचा वापर केला तरी आमच्या माताभगिनी झुकणार नाहीत.
यावेळी अश्विनी धोत्रे, अपर्णा पाटील, कु. समृद्धी गुरव यांची भाषणे झाली. श्रुतिका काटकर, रसिका पाटील वृषाली पाटील, विजयमाला चौगले, अर्चना खाडे, मंगल कळके, शुभांगी शिरोळकर, सुजाता सुतार, तेजस्विनी लोहार, पूनम सातपुते, वंदना पाटील, सुनंदा पाटील, उषाताई माने, शुभांगी शिरोकर, तेजस्विनी लोहार, पूनम सातपुते, महिला उपस्थित होत्या.
———————————
राहुल पी.पाटील यांनी आपला आशीर्वाद मुलगा म्हणून, भाऊ म्हणून माझ्या पाठीशी राहूदे. मी आपल्यासाठी कायम कार्यरत राहणार असल्याचा विश्वास दिला.
तेजस्विनी राहुल पाटील यांनी उपस्थित महिला मोठ्या संख्येने आल्याबद्दल त्यांचे आभार मानून राहुल पाटील यांच्या हात चिन्हासमोर बटण दाबून आपली सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले.
———————————