राहुल पी. पाटील यांच्या उद्याच्या वडणगे येथील प्रचार शुभारंभाची जय्यत तयारी : हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
कोल्हापूर :
इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल पी.एन.पाटील यांचा प्रचार शुभारंभ शिवपार्वती क्रीडांगण वडणगे सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी स. ९ वा. आयोजित केला आहे, तरी सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रचार शुभारंभासाठी खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शेकापचे क्रांतीसिंह पवार पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके आदीसह महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने काँग्रेसचे उमेदवार राहुल पी.पाटील गटाच्या व महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. सभास्थळी भव्य व्यासपीठ, प्रशस्त मंडप उभारणी, खुर्च्याची मांडणी करून जय्यत तयारी करण्यात आली आहे.