कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीत अनेकांना डावलून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ, देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. कोल्हापुरात दक्षिणमधून अमल महाडिक व इचलकरंजीतून राहुल आवाडे यांची नावे जाहीर करण्यात आली.
चंद्रशेखर बावनकुळे – कामठी, देवेंद्र फडणवीस -नागपूर दक्षिण पश्चिम, नंदुरबार- विजयकुमार गावित, धुळ- अनुप अग्रवाल, शिंदखेड- जयकुमार रावल, गिरीश महाजन यांना जामनेर, आकाश फुंडकर यांना खामगाव, संजय कुटे यांना जळगाव (जामोद), रणधीर सावरकर यांना अकोला पूर्व, प्रताप अडसद यांना धामगाव रेल्वे, प्रवीण तायडे यांना अचलपूर, राजेश बकाणे यांना देवळी, समीर कुणावर यांना हिंगणाघाट, तर डोंबिवलीमधून रविंद्र चव्हाण आदींनी उमेदवारी जाहीर झाली आहे.