छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण: छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज : राहुल गांधी
कोल्हापूर :
देशामध्ये एक देश जोडणारी व सर्वांना सोबत घेऊन जाणारी विचारधारा आहे. तर दुसरी संविधान संपविणारी विचारधारा आहे, जी लोकांना घाबरवते. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतात, पण त्यांच्या विचाराच्या विरुद्ध आचरण करते, अशी टीका विरोधकांवर करत छत्रपती शिवाजी महाराज महान व्यक्तीमत्व आहे. त्यांचे विचारच देशाच्या संविधानात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे फक्त पुतळे उभारून चालत नाही तर त्यांच्या आचार-विचारांचे खऱ्या अर्थाने पालन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केले.
कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण अंत्यन्त उत्साही वातावरणात पार पडला. खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आहे, याप्रसगी ते बोलत होते. आमदार सतेज पाटील यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम भव्यदिव्य असा संप्पन्न झाला. यावेळी पुतळयाचे शिल्पकार सचिन घारगे( पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर ) यांचा राहुल गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शाहू महाराज यांची भाषणे झाली. यां कार्यक्रमासं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, संजय डी.पाटील, छत्रपती मालोजीराजे, आमदार ऋतुराज पाटील, मालोजीराजे, जयश्री जाधव, राजू आवळे, जयंत आसगावकर, राहुल पाटील तसेच मान्यवर, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.