कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण उद्या शनिवारी होणार : शुक्रवारच्या कार्यक्रमात झाला बदल : पुतळा अनावरण राहुल गांधी यांच्याच हस्ते होणार : आम. सतेज पाटील
कोल्हापूर :
कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात होणार होते. मात्र एनवेळी राहुल गांधी दिल्लीतून येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा शुक्रवारचा दौरा रद्द झाला. त्यामुळे पुतळा अनावरण कार्यक्रमात बदल करून उद्या शनिवारी सकाळी १० वाजता पुतळा अनावरण कार्यक्रम होईल आणि ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याच हस्ते होईल, असे कार्यक्रमाचे आयोजक आमदार सतेज पाटील यांनी सांगितले तसेच शनिवारी होणाऱ्या यां कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहनही पाटील यांनी केले.
कोल्हापुरातील यां नियोजित कार्यक्रमास काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीताला, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, आम. विश्वजीत कदम यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर कोल्हापुरात आले आहेत.
बदललेल्या रूपरेषेनुसार खासदार राहुल गांधी यांचे शनिवारी सकाळी कोल्हापुरात आगमन होणार आहे. सकाळी त्यांच्या हस्ते कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला ते भेट तसेच दुपारी साडेबारा वाजता संविधान संमेलनास उपस्थित राहणार आहेत.