भविष्यात योजनेच्या रकमेत आणखी वाढ करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : कोल्हापुरात ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ वचनपूर्ती सोहळा
कोल्हापूर :
३३ हजार कोटीची तरतूद केली आहे. कोणी कितीही अफवा पसरवू दे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
योजना अजिबात बंद केली जाणार नाही. ही योजना बंद नव्हे तर बहिणींनी आशीर्वाद दिला तर त्यात आणखी वाढ करू. या योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येत आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले आहे. अनेक योजना राबवीत आहोत. आमचे सरकार सामान्य माणसाचे व बळीराजाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कोल्हापुरातील तपोवन मैदानावर आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी योजनेतील महिला लाभार्थी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी व उत्कृष्ट कार्य केलेल्या अंगणवाडी सेविकांचा प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘लाडकी बहिण योजेनंतर्गत सप्टेंबरअखेर सुमारे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील यासाठी सरकारकडून कडून प्रतिवर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाणार आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर दोषींना फाशी व्हावी यासाठी न्यायालयाकडे पाठपुरावा करणार आहे. आम्ही यां योजनेद्वारे महिलांना लाच देत नाही तर बहिणींचे प्रेम घेत आहोत. विरोधकांना बहिणींचे प्रेम कळणार नाही अशी टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, १५00 रुपयेची किमत गरिबाना माहिती आहे. आमच्या बहिणी काटकसरीने हा पैसा संसारासाठी वापरतील आणि त्या सक्षम होतील.
महिलांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. खात्यावर जमा झालेल्या रकमेतून बँकानी रक्कम कपात करून घेऊ नये असेही त्यांनी ठणकावले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, माजी आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, महेश जाधव अमल, कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद प्रशासक कार्तिकेयन एस. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.