ऑलिम्पिकवीर  स्वप्नील कुसाळेचे कोल्हापुरात ‘ जंगी स्वागत’ : हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी, वाद्यांचा  निनाद,  शुभेच्छांचा वर्षाव, मोठी गर्दी 

कोल्हापूर : 

कोल्हापूरच्या कांबळवाडीच्या  (ता. राधानगरी) स्वप्नील कुसाळे याने  पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत  २५ मीटर एअर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदक मिळवून जगात भारताचे नाव केले. ऑलिम्पिकवीर स्वप्नीलचे आज बुधवारी (दि. २१)  कोल्हापुरात आगमन होताच कोल्हापूरवाशियांनी त्याचे जंगी स्वागत केले. ताराराणी चौक ते दसरा चौकापर्यंत भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.स्वप्नीलवर हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. 

ऑलिम्पिकवीर  स्वप्नील कुसाळेचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि  प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येड़गे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मिरवणुकी दरम्यान स्वप्नीलने छत्रपती ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज, राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  स्वप्नीलने राष्ट्रध्वज घेऊन  उपस्थितांना नमस्कार  करताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. फुलांनी साजविलेल्या  वाहनातून स्वप्नीलची मिरवणूक काढण्यात आली. या वाहनात स्वप्नीलची आई अनिता कुसाळे, वडील सुरेश कुसाळे यांच्यासह कुटुंबीय व प्रशिक्षक सोबत होते. 


यावेळी  खासदार धनंजय महाडिक, खासदार चैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, जयश्री जाधव, यांच्यासह लोकप्रतिनिधी,  विविध क्षेत्रांतील पदाधिकारी,  क्रीडाप्रेमी,   कोल्हापूरकर  उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!