राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दौड : दिंडनेर्ली येथे स्व. राजीव गांधी व स्व. आमदार पी.एन.पाटील यांना अभिवादन, दौडला भावनिक किनार
कोल्हापूर :
माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दौड साधेपणाने साजरी करण्यात आली. प्रारंभ छत्रपती शाहू बोर्डिंगच्या प्रांगणामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सद्भावना दौडला प्रारंभ करण्यात आला.दिंडनेर्ली येथील राजीवजी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी व स्व. आमदार पी.एन.पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दसरा चौक येथे आमदार ऋतुराज पाटील, श्रीपतराव दादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील, राजीवजी सूतगिरणीचे चेअरमन राहुल पाटील, आम. जयंत आसगावकर, आम. जयश्री जाधव, व्ही. बी पाटील, सचिन चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्व. आमदार पी.एन.पाटील यांच्या संकल्पनेतून माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेली सद्भावना दौड यावर्षीही संपन्न झाली. मात्र आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे यावर्षीचा सद्भावना दौड कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला. याप्रसंगी कार्यकर्त्यांना स्व.पी.एन.पाटील यांची उणीव क्षणोक्षणी जाणवू लागल्याने कार्यकर्ते भावनाविवश दिसत होते. दौडला भावनिक किनार प्राप्त झाली होती.
दिंडनेर्ली येथे सूतगिरणी कार्यस्थळावर सकाळी साडेअकरा वाजता सद्भावना दौड ज्योतीचे ‘ अमर रहे अमर रहे राजीव गांधी अमर रहे ‘, ‘ अमर रहे अमर रहे पी.एन.साहेब अमर रहे ‘ अशा घोषणांनी दौडचे आगमन झाल. आमदार ऋतुराज पाटील, राजीवजी सूतगिरणीचे चेअरमन व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, श्रीपतराव दादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी आणि स्व.आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रतिमेचे पूज करण्यात आले.
यावेळी राजीवजी सूतगिरणीचे चेअरमन राहुल पाटील म्हणाले, राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्व. आमदार पी.एन.पाटील यांनी सद्भभावना दौड सुरू करून जे विचार रुजविण्याचे कार्य केले, तो विचार घेऊन सर्वजण पुढे जाऊ. सर्वांचे प्रेम व आशीर्वाद, पाठबळ येणाऱ्या काळात आम्हाला बळ देणारे असेल. यापुढे दरवर्षी ही दौड कायम राहील.
प्राचार्य आर.के.शानेदिवाण यांनी मनोगत व्यक्त करताना स्व. आमदार पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी भोगावती कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील, बयाजी शेळके, सचिन चव्हाण, बी.एच. पाटील, तेजस्विनी राहूल पाटील, सुप्रिया साळोखे, राजीवजी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती भारत पाटील भूयेकर, संदिप पाटील, आप्पासाहेब माने, शंकरराव पाटील, हिंदुराव चौगले, मानसिंग बोंद्रे, बाळासाहेब पाटील, शिवाजी कवठेकर, पै. संभाजी पाटील, एकनाथ पाटील, शाहू काटकर, सर्जेराव पाटील, निवास पाटील यांचेसह भोगावती कारखान्यचे संचालक, राजिवजी सूतगिरण, निवृत्ती संघाचे व श्रीपतराव दादा बँकेचे संचालक, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.