९ ऑगस्टला कोल्हापुरातील मनोज जरांगेंच्या रॅली व सभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राजेंद्र सूर्यवंशी यांचे आवाहन
करवीर :
कोल्हापूर येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनी मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांची रॅली व सभा होत आहे. या अनुषंगाने रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी बीडशेड येथील सूर्यवंशी गॅरेजमध्ये नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत बोलताना माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, मराठा आंदोलनाला करवीर पश्चिम भागातून आतापर्यंत भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. यापुढेही सर्वांनी एक मराठा – लाख मराठा ही वज्रमूठ कायम ठेवून प्रत्येक घरातून माणूस बाहेर पडावा. पश्चिम भागातील सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. अध्यक्ष महेचे माजी सरपंच सज्जन पाटील होते.
याप्रसंगी सज्जन पाटील, उत्तम पाटील, जगदीश पाटील, शिवाजी लोंढे यांनी मराठा समाजाची होणारी होरपळ विशद करून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. या बैठकीला शामराव सूर्यवंशी, केरबा जाधव, माणकू माने, परशुराम चौगले, नामदेव एकल, संदीप पाटील, लालासो दिंडे,दीपक माने, पांडुरंग चौगले, बाबुराव हिलगे, बाळासाहेब सूर्यवंशी, तानाजी तावडे, कृष्णात हळदकर, एम. एस. कंदले, बळी पाटील, बाजीराव माने, प्रकाश माने, तसेच पश्चिम भागातील मराठा समाज बांधव उपस्थित होते.