‘एक मित्र- एक वृक्ष’ संकल्पनेतून ‘ फ्रेंडशिप डे ‘ : राहुल पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा विधायक उपक्रम
कोल्हापूर :
‘एक मित्र – एक वृक्ष’ या संकल्पनेतून फ्रेंडशिपनिमित्त जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी.पाटील-सडोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर विधानसभा मतदारसंघात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक विधायक उपक्रमाने फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. पिरवाडी, खुपिरे यासह अनेक अनेक गावात वृक्षारोपण करून फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. जिल्ह्यात विविध प्रकारे फ्रेंडशिप डे साजरा केला जात असताना वृक्षाशी म्हणजेच पर्यावरणाशी मैत्री करण्याचा संदेश यानिमित्ताने राहुल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पिरवाडी येथे या विधायक उपक्रमाद्वारे राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती अश्विनी धोत्रे, हनुमान सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश वाडकर, माजी चेअरमन विलास पोवार, ग्रामपंचायत सदस्य जयकर टेळके, मोहन शेळके, साताप्पा लाड, पांडुरंग खोत, अभिजीत चव्हाण, संभाजी हराळे, सर्वेश जाधव, जयसिंग पोवार यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.