टोलवरुन काँग्रेसचा टोला : आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली किणी टोल नाक्यावर आंदोलन ( ‘टोल नाही, टोला द्या. रस्ता नाही ,टोल नाही ‘ )
कोल्हापूर :
काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज किणी टोल नाक्यावर
खड्ड्यांनी भरलेल्या कोल्हापूर पुणे महामार्गावर टोल का द्यायचा ? असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेस पक्षातर्फे केलेल्या आंदोलनात सुरू आहे.
या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजुबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव ,आमदार जयंत आसगावकर,राहुल पी. पाटील यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. भर पावसात आमदार सतेज पाटील आंदोलनस्थळी ठिया मारून बसले आहेत.
‘ टोल नाही, टोला द्या. रस्ता नाही ,टोल नाही अशा घोषणा देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्ते चांगले नाहीत तर टोल नाही असा आक्रमक पवित्रा घेत आंदोलनस्थळी गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणाचे फलक लक्षवेधी ठरत होते. आंदोलनात गोकुळचे संचालक शशिकातं पाटील चुयेकर, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, शिवाजीराव कवठेकर, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर, काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर सुलोचना नाइकवडे, विक्रम जरग, संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, भारती पोवार, प्रविण केसरकर, तौफिक मुल्लाणी, दुर्वास कदम, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, संध्या घोटणे, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, पूनम हवालदार, शशिकांत खवरे, संदीप पाटील यांचेसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.