‘ गोकुळ’ मध्ये योग दिन उत्साहात साजरा : निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग हा सर्वोत्तम उपाय : ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील (आबाजी)

कोल्‍हापूर ता.२१: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने जागतिक योग दिनानिमित्त  संघाच्‍या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील (आबाजी) यांच्‍या मार्गदर्शनाखाली व संचालक यांच्‍या उपस्थित योग दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी योगमित्रचे योगशिक्षक संजय पोवार यांनी योगाचे महत्‍व पटवून देवून प्रात्‍यक्षिके करुन दाखवलीत.

          यावेळी मार्गदर्शन करताना संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील (आबाजी) म्‍हणाले कि, दैनंदिन कामाच्‍या धावपळीत माणसाला उसंत मिळत नाही. कामाचा व्‍याप, पैश्‍यामागची धडपड किंवा यश,कीर्ती,अर्थप्राप्‍ती इत्‍यादी मध्‍ये आरोग्‍य रक्षण होवूनही दीर्घायुष्‍य हा भाग चिंतनीय आहे.  सध्‍याच्‍या धावपळीच्‍या जगात निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग हा एकमेव उपाय असून नित्‍य नियमाने योगासने करावी असे प्रतिपादन गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील (आबाजी) यांनी जागतिक योग दिनानिमीत्‍य आयोजित केले योग शिबीरप्रसंगी केले.

यावेळी योग विद्येतील विविध योगासनांची प्रात्‍यक्षिके, उदा.सर्वांगासन,पादान्‍गुष्‍टासन, शशिकासन, मंडूकासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, विपरीत नौकासन, पर्वतासन, ताडासन इ.आसने श्री.पाटील यांनी कर्मचा-यांसमोर सादर करुन सदरची योगासने कर्मचा-यांकडून करवून घेतली आणि ही आसने नित्‍यनियमाने सर्व कर्मचा-यांनी करावीत असे आवाहनही त्‍यांनी केले.

          यावेळी योगमित्रचे शिक्षक संजय पोवार (सर) व विशाल गुडूळकर यांनी योगा विषय सविस्तर माहिती दिली व प्रात्यक्षिके करून दाखवली. या कार्यक्रमाचे सूञ संचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले.

          या कार्यक्रम प्रसंगी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील (आबाजी), संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, सहा.महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, संगणक सहा.व्यवस्थापक व्ही.व्ही.जोशी, खरेदी व्यवस्थापक के.एन.मोळक, अभियांत्रिकी व्यवस्थापक प्रताप पडवळ, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ.पी.जे.साळुंखे, डॉ.प्रकाश दळवी, संकलन सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, बी.आर.पाटील, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील, बी.एस.मुडकशिवाले संघाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!