थकित वीज बिलापोटी घरगुती वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा
कोल्हापूर :
वीज कनेक्शन कापण्यावरील स्थगिती उठवली, अशी बातमी झळकल्यानंतर महावितरण कंपनीने आज घरगुती वीज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. दोनवडे ता. करवीर येथे एकाच दिवसात सुमारे ७० घरगुती वीज कनेक्शन कट केलीत. अचानक वीज कनेक्शन कट करण्यासाठी वायरमन यांचे पथक आल्यानंतर ग्रामस्थांची अडचण निर्माण झाली. वीज कनेक्शन कट केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तून तीव्र संताप व्यक्त होत आहे.वीज कट केल्याने शेतकरी कुटुंबांची
रात्र अंधारात गेली आहे.
कोरोनाचे संकट यातच वाढीव वीज बिल यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे,अशा परिस्थितीत महावितरणने कोरोना,आणि लॉक डाउन कालावधीतील घरगुती वीज बिल माफ करावे अशी मागणी होत होती.
करवीर तालुक्यातील सांगरुळ, खूपिरे, पाडळी खुर्द, दोनवडे येथे व अनेक गावात वीज बिलांची होळी करण्यात आली होती.
कोरोना चा संसर्ग वाढत होता ,केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली होती. २२ मार्चपासून लॉक डाऊन केले होते. यामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती,अशा वेळी शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत असताना वीज बिलात १५ टक्के वीज दर वाढ केली आहे, यामध्ये ३०० युनिटच्या आतील संपूर्ण वीज बिले माफ करावे अशी मागणी सर्व पक्षीय संघटनानी केली होती.वीज दरात १०० युनिटपर्यंत ४६ पैसे,व त्यावरील ३०० युनिटपर्यंत ४१ पैसे वाढ केली आहे.राज्यभरात एक लाख ९७ हजार ग्राहक आहेत, यांना सुमारे सहाशे कोटी चा वाढीव बिलाचा भुर्दंड बसणार आहे.वीज बिल माफ करण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत नागरिकांनी घरगुती वीज बिल भरू नये असे आवाहन एरिगेशन फेडरेशन यांनी केले होते. यामुळे नागरिकांनी वीज बिल भरलेले नाही.आणि आता वीज बिल मोठ्या प्रमाणात थकले,असे असताना महावितरण कंपनीकडून वीज बिलापोटी वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे.आज दोनवडे ते सुमारे ७० घरगुती वीज ग्राहकांची वीज कट केली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या तून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रामचंद्र पवार वीज ग्राहक दोनवडे,
कोरोनाचे संकट यातच वाढीव वीज बिल यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे,अशा परिस्थितीत महावितरणने कोरोना,आणि लॉक डाउन मधील वीज बिल माफ करावे, पूर्वसूचना न देता वीज कट केली जात आहे.
एस. मरळीकर उपकार्यकारी अभियंता फुलेवाडी,
घरगुती वीज बिलात सवलत नाही, टप्प्याटप्प्याने सर्व गावात थकित वीज बिलापोटी कारवाई होणार.
वायरमन यांनी सांगितल्यानुसार दिवसभरात सुमारे ६५ ते ७० ग्राहकांची वीज कपात केली होती. रात्री ८ वाजता वायरमन यांच्याशी संपर्क साधला असता सुमारे ३८ ते ४० कुटुंबांनी वीजबिल भरले,त्यांची वीज जोडली असून, तीस कुटुंब अजूनही अंधारात आहेत अशी माहिती सांगितली आहे.