दिवंगत आम.पी.एन.पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली एकनिष्ठेची शपथ : राजेश – राहुल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय
कोल्हापूर :
काँग्रेसचे निष्ठावंत नेते, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्या पश्चात कार्यकर्त्यांचे नेतृत्व राजेश पाटील – राहुल पाटील यांनी करावे. आम्ही यांच्या पाठीशी एकनिष्ठेने राहणार अशी शपथ कार्यकर्त्यांनी घेतली.
कोल्हापूर – गगनबावडा मार्गावरील वाकरे फाटा (ता. करवीर ) येथील विठाई – चंद्राई लॉन मध्ये स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आणि समर्थकांचा मेळावा पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बी.एच. पाटील होते.
यावेळी ‘ साहेबांच्या माघारी – आमची जबाबदारी ‘ असा निर्धार व्यक्त केला. सुरुवातीला दिवंगत आमदार पाटील यांच्या प्रतिमेला वंदन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ‘ अमर रहे अमर रहे आमदार पी.एन.पाटील अमर रहे’ घोषणा देण्यात आल्या. मेळाव्या निमित्त हजारों कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने सभागृह खचाखच भरले होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी केले. यावेळी गोकुळचे संचालक विश्वास पाटील, गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे, प्राचार्य आर. के.शानेदिवाण म्हणाले, भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, जयसिंग हिर्डेकर, शाहू काटकर, भरत मोरे( पन्हाळा तालुका) बाजार समिती सभापती भारत पाटील, उदयानीदेवी साळुंखे, बी.के.डोंगळे, राजीवजी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील, एम.आर.पाटील कुरुकलीकर, प्रकाश मुगडे, आप्पासाहेब माने, केडर प्रतिनिधी दत्तात्रय पाटील, दादू कामिरे, विजय कांबळे यांचेसह प्रमुख कार्यकर्त्यांची मनोगते झाली.
याप्रसंगी कृष्णराव किरुळकर, संभाजी पाटील कुडीत्रेकर, अमर पाटील, एकनाथ पाटील, शिवाजी कवठेकर, संदीप पाटील, शिवाजी कारंडे, श्रुतिका काटकर, शिल्पा पाटील, आश्विनी धोत्रे, सविता पाटील, अर्चना खाडे, सुभाष सातपुते, यांचेसह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुनील खराडे, शपथ वाचन डॉ.लखन भोगम यांनी तर शोकसंदेश वाचन एस.व्ही.पाटील यांनी केले. आभार काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील यांनी मानले.