‘गोकुळ’ मार्फत आमदार पी.एन.पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
कोल्हापूर ता.२१: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान. श्री.पी.एन.पाटील साहेब यांच्यावर अपघातामुळे सध्या अस्टर आधार हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. आमदार पी.एन.साहेब यांची प्रकृती सुधारावी व यातून लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी गोकुळ परिवारा मार्फत गोकुळच्या ताराबाई पार्क येथील हनुमान मंदिरामध्ये अभिषेक घालून आमदार पी.एन.पाटील साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.किटे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.