युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींच्या स्वागतासाठी लोटली अख्खी बनाचीवाडी : शाहू छत्रपतींच्या विजयासाठी ग्रामस्थांची एकीची वज्रमूठ 

राधानगरी : 

बनाचीवाडी (ता. राधानगरी) हे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांसद आदर्श ग्राम  दत्तक योजनेतून  घेतलेले राधानगरीच्या कुशीत वसलेले गाव. या गावाने शनिवारी शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त गावी आलेल्या युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींचे जंगी स्वागत केले. स्वागतासाठी अख्खा गाव लोटला होता. या निवडणुकीत संपूर्ण गाव शाहू छत्रपती महाराजांच्या पाठीशी ठामपणे आहे हे एकीच्या वज्रमुठीतून दाखवून दिले. 

शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारासाठी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावे नि गावे पिंजून काढत आहेत. राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी येथे भेटीदरम्यान  दारातील सडारांगोळी, रस्त्याच्या   दुतर्फा डोक्यावर कळस घेऊन उभ्या असलेल्या सुवासिनी, मुलींचा मर्दानी खेळ, घोडा नाचविणे, लेझीम खेळाने चैतन्यदायी वातावरण बनले होते. ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने स्वागत केले ते लक्षवेधी असेच होते. 

यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या,  राजर्षीपासून ते आजपर्यंत छत्रपती घराणे आणि बनाचीवाडी हे नाते कायम राहिले आहे. केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे तर जी गावे खरेच दुर्लक्षित आहेत अशीच गावे संभाजीराजेंनी आदर्श सांसद ग्रामसाठी निवडली. येळवण जुगाई, जाखले ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यानंतर आम्ही बनाचीवाडी दत्तक घेउन कोट्यवधीची कामे पूर्ण केली.  येळवण जुगाई, जाखलेप्रमाणे बनाचीवाडीचा चेहरामोहरा बदलला. आगामी काळातही हे पालकत्व कायम राखू. 

जयवंत पताडे म्हणाले, दत्तूमामा पार्टे यांच्या माध्यमातून गाव छत्रपती घराण्याशी जोडला गेला. गाव दत्तक घेण्यामागे संयोगिताराजे छत्रपतींचा आग्रह गावासाठी मोलाचा ठरला. संभाजीराजेंनी गावात ४ कोटींची विकासकामे केली. विकासकामाबरोबरच  गावाचे खऱ्या अर्थाने पालकत्व छत्रपती घराण्याने पूर्ण केले आहे. त्यामुळे आता पाल्य म्हणून संपूर्ण गाव या निवडणुकीत शाहू छत्रपतींना भरघोस मताधिक्य देणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. 

यावेळी  सरपंच प्राजक्ता जयवंत पताडे, माजी सरपंच रेश्मा  पाटील, बापू घोलकर, बबन पाटील, दत्तात्रय वंजारे,  आप्पासाहेब पताडे, सुरेश पताडे, रतन पताडे, उत्तम जांभळे, संजय पताडे, संजय चव्हाण, उत्तम पताडे, शंकर जाधव, बी. एम. पताडे, दीपक काशीद, बाबुराव चव्हाण, एकनाथ वंजारे, शुभम पाटील, सागर पताडे,  उपसरपंच रवींद्र नरसाळे, ग्रामपंचायत सदस्य विमल पताडे, सुनीता पताडे, ऋतुजा पताडे, संगीता वंजारे, रामचंद्र असणेकर, श्रीकांत डवर यांचेसह गावातील सर्व गटाचे पदाधिकारी,  कार्यकर्ते, युवक – युवती, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!