चंदगडचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती ( शाहू छत्रपती महाराजांना विजयी करण्याचे चंदगडकरांना आवाहन )

चंदगड :

चंदगड तालुका हा कोल्हापूरपासून लांब असला तरी निसर्गाचे वरदान लाभल्याने तालुक्याच्या पर्यटनवाढीस भरपूर वाव आहे. येथील चवदार काजूला चांगली बाजारपेठ मिळवून देण्याची तसेच केंद्र स्तरावर पाठपुरावा करून काजूला हमीभाव मिळवून देण्याची गरज आहे. ग्रामीण भागात अजूनही पायाभूत सुविधांची कमतरता आहे. छत्रपती घराणे आणि चंदगड हे एक वेगळेच नाते आहे. चंदगडचचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा, असे प्रतिपादन करून युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे
इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यातील आमरोळी, अलबादेवी, शिरोली, सत्तेवाडी, इब्राहिमपूर
गावांचा दौरा केला. यावेळी गावागावांत महिलांनी, ग्रामस्थांनी मोठ्या आस्थेने त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी सर्वांना शाहू छत्रपती महाराजांना विजयी करण्याचे चंदगडकरांना आवाहन केले.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, काँग्रेसने सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कष्टकरी डोळ्यासमोर ठेवून जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे तेथे सर्व निर्णयाची पूर्तता होत आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे. आताच्या जाहीरनाम्यातील सर्व बाबींची पूर्तता होणारच ही काँग्रेसची गॅरंटी आहे. सर्वांनी आपापले बाहेरगावी असणारे मतदार घेऊन ताकदीने शाहू छत्रपती महाराजांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत.

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अनिल दळवी, देशाला खऱ्या अर्थाने शिव – शाहुंच्या विचारांची गरज असून ठाकरेंचे शिवसैनिक प्रामाणिकपणे शाहू छत्रपती महाराजांना मताधिक्य देण्यासाठी राबणार असल्याचे सांगितले.

प्रचार दौऱ्यास शिवसेना ठाकरे गट जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, माजी उपसभापती विद्याधर गुरबे,
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, राजश्री तात्यासाहेब देसाई, माजी पंचायत समिती सदस्या विद्या विलास पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रूपाताई खाण्डेकर, नंदिनी पाटील, , शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अनिल दळवी, , शांता जाधव, नितीन पाटील, डॉ. विजयकुमार कांबळे, डॉ. सदानंद गावडे, अक्षय करंबळकर, सुरेश हरेर, विष्णू यादव,पिंटू मंडलिक, सरपंच प्रकाश वाईगडे, दशरथ वाईगडे, रघुनाथ भादवणकर, श्रीकांत नेवगे, सरपंच पांडुरंग देवलकर, माजी सरपंच अशोक देसाई, चंद्रकांत हावळ, मोहन पेडणेकर आदीसह कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!