शिव-शाहूंचा समतेचा विचार दिल्लीत पाठवूया – संभाजीराजे छत्रपती ( आजरा तालुक्यातील  कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील गावांचा प्रचार दौरा) 

कोल्हापूर : 

 पुरोगामी विचार जिवंत ठेवण्यासाठी शिव – शाहूंचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचवूया.देशातील दडपशाही मोडून काढण्याची गरज आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. 

 महाविकास व इंडिया आघाडीचे लोकसभा  उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ कोळिंद्रे (ता.आजरा)  येथे ते बोलत होते. रविवारी कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील गावांचा प्रचार दौरा केला.

 संभाजीराजे छत्रपती पुढे  म्हणाले, लोकसभेची ही निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. सध्याची दडपशाही लोकशाहीला घातक आहे. बदल केल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, शाहू महाराज खासदार झाल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक  तालुक्यांमध्ये कार्यालय सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या,  जनतेनंच शाहू महाराजांना खासदार करण्याचे ठरविले आहे. सुसंस्कृत आणि वैचारिक वारसा लाभलेले आपले उमेदवार आहेत. सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे. महागाईने जनता त्रस्त झाली आहे.” ना खाऊंगा …ना खाने दूंगा”  असा नारा देणारे भाजपच भ्रष्टाचारात पुढे आहे. तरुणांना नोकरी नाही. उद्योगधंदे अडचणीत आल्याने बेरोजगारी वाढली आहे.

गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, मुकुंदराव देसाई, आप्पी पाटील, स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय पोवार, श्रीमती रचनाताई होलम, रामराज कुपेकर, अभिषेक शिंपी, संपतराव देसाई, संतोष मास्तोळी, अशोक तरडेकर, संजय येसादे, रवी भाटले, युवराज पोवार, दिनेश कुरूनकर यांच्यासह महाविकास व इंडिया आघाडी, जनता दलाचे, वंचित आघाडीचे स्थानिक पदाधिकारी , कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

————

 प्रा.मंडलिकांसाठी अनवाणी फिरलो, पण त्यांनी  दगा दिला..

गत लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रा. संजय मंडलिक हे विजयी झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही,असा संकल्प करून साडेतीन महिने त्यांच्यासाठी उन्हातान्हातून वणवण फिरलो. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी जीवाचे रान केले परंतु ऐनवेळी त्यांनी आम्हाला दगा फटका देऊन कोणत्याही प्रकारे विचारात न घेता शिंदे गटात प्रवेश केला. ज्यांच्यासाठी आम्ही अनवाणी फिरलो त्यांनी आमच्याशी केलेली ही प्रतारणा असून त्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ.पण यावेळी श्रीराम नवमीचे औचित्य साधून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना निवडून आणण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला असून निश्चितच त्यांना निवडून आणू असा विश्वास शिवसेना ( उबाठा ) उपतालुकाप्रमुख संजय येसादे यांनी व्यक्त केला.

‐————-

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!