ए.वाय. पाटील यांचा महारॅली काढत शाहू छत्रपती महाराज यांना जाहीर पाठिंबा
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी महारॅली काढत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह नवीन राजवाडा, कोल्हापूर येथे श्री. शाहू छत्रपती महाराज यांना जाहीर पाठिंबा दिला. प्रचंड संख्येने रॅलीतून आलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह होता. सभा स्थळी कार्यकर्त्यांनी ए वाय यांना उचलून नेत विजयी घोषणा दिल्या. शाहू छत्रपती महाराज यांनी आलिंगन देत ए.वाय. यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील सडोलीकर, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, आर. के. पोवार , पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, भारत पाटील-भूयेकर, नेताजी पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र कवडे, बी. एस. पाटील-अकनूरकर, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मान्यवर, हजारो ए. वाय. पाटील प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.