देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे काम संसदेत चालते, यासाठी शाहू महाराजांच्या रूपाने कुशल प्रशासक आणि अभ्यासू व्यक्तीमत्व खासदार निवडा : संभाजीराजे छत्रपती
चंदगड :
श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ संभाजीराजे छत्रपती यांचा जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय दौरा सुरू असून आज ते चंदगडमधील तुडीये जिल्हा परिषद गटाच्या दौऱ्यावर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जेलुगडे या गावी आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून संभाजीराजे यांनी आपल्या दौऱ्यास सुरूवात केली.
कलिवडे या गावामध्ये आयोजित मेळाव्यास संबोधित करत असताना संभाजीराजे म्हणाले की, लोकसभेच्या रणांगणात महाराज उतरले आहेत, ते स्वतःसाठी नाही. सध्याच्या राजकारणाची घसरलेली पातळी पाहून महाराजांनी जनतेच्या इच्छेखातर हा निर्णय घेतला.
संसदेच्या कामकाजामध्ये नवनवीन कायदे पारित होत असतात. धोरणात्मक निर्णय घेतले जातात. आपण निवडून दिलेला प्रतिनिधी फक्त मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नसतो, तर महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीत जात असतो. महाराजांसारखे कुशल प्रशासक आणि अभ्यासू व्यक्तीमत्व संसदेत गेल्यास त्याचा फायदा कोल्हापूरसाठी नक्कीच होईल. यासाठी चंदगडकरांची साथ महत्वाची असणार आहे.
आजच्या दौऱ्यात संभाजीराजे छत्रपती यांनी तुडीये, जेलुगडे, पाटणे, शेवाळे, आंबेवाडी, कलिवडे, जंगमहट्टी, माडवळे, कोलिक, म्हाळुंगे, ढेकोळी, सरोळी, सुरुते, शिनोळी बु., शिनोळी खुर्द, देवरवाडी, महिपालगड, तडसिनहाळ, तुर्केवाडी, कारवे, मांडेदुर्ग, ढोलगरवाडी, गौळवाडी या गावांना भेटी देऊन ठिकठिकाणी बैठका व मेळाव्यांना संबोधित केले.
यावेळी गोपाळराव पाटील, “स्वराज्य”चे संजय पोवार, माजी जि.प. सदस्य विलास पाटील, एम.जे. पाटील, शिवाजी गावडे, विष्णू गावडे आदी उपस्थित होते.