चंदगडची जनता शाहू महाराजांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देईल : संभाजीराजे छत्रपती ( चंदगड तालुक्यात संभाजीराजेंच्या दौऱ्यात गावोगावी उत्स्फूर्त पाठिंबा )
चंदगड :
चंदगडच्या जनतेने नेहमीच छत्रपती घराण्यावर प्रेम केले आहे. येथील स्वाभिमानी जनता आमच्या पाठीशी कायम राहिली आहे. राजकारणाची पातळी खालावत आहे अशा वेळी शाहू छत्रपती महाराजांसारखे निष्कलंक व्यक्ती संसदेत जाणे गरजेचे आहे. हात चिन्हासमोरचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. चंदगडची जनता शाहू महाराजांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देईल असा विश्वास माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.
गेली तीन दिवस संभाजीराजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यातील जनतेच्या गाठीभेटी घेऊन दौरा पूर्ण केला. चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी, दुंडगे, कोवाड, कागणी, किणी, होसूर, किटवाड, कुदनूर, कालकंद्री आदी गावां
तील संपर्क दौऱ्यात जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी सर्वांना शाहू महाराजांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी शाहू छत्रपती महाराज यांची इंडिया आघाडी व महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होताच संभाजीराजे छत्रपती यांनी ग्रामीण भागातील प्रचार दौरे सुरु केले. गाव आणि गाव ते पिंजून काढत आहेत. प्रचार दौऱ्यात जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
या संपूर्ण दौऱ्यात जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळत आहे. यावेळी फक्त ” शाहू महाराज… शाहू महाराज ” असा नाराच जनता देऊ लागली आहे.
दौऱ्यात कालकुंद्री येथील कल्मेश्वर मंदिर परिसरात महाविकास आघाडीतील व मित्र पक्षांतील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक विजय कोकितकर यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील, दौलतचे माजी संचालक शिवाजी पाटील, सरपंच छाया जोशी, माजी सरपंच आप्पाजी वरपे, शिवाजी जाधव, शिवाजी नाईक, रामू जोशी, शिवसेना शाखेचे सर्व शिवसैनिक, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी व दूध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवतेज फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी राजे यांची भेट घेऊन शाहू महाराजांना पाठिंबा व्यक्त केला. फाउंडेशनच्या वतीने त्यांचे स्वागत जे.एस.पाटील यांनी केले. यावेळी संजय पवार, संतोष सुतार, नंदू ढेरे,सुभाष पाटील, सदानंद पाटील, सिद्धाप्पा नाईक, विठोबा पाटील, अशोक जोशी, संजय पाटील, शंकर मुर्डेकर, दत्तू कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.