शाहू महाराज जनतेच्या मनातले उमेदवार , त्यांना संसदेत पाठवूया : संयोगिताराजे छत्रपती ( सावर्डे दुमाला ते घानवडे, शिरोली दुमाला ते गणेशवाडी दौरा)
राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य चौफेर राहिले आहे. त्यांनी केलेल्या सर्व क्षेत्रातील भरीव कार्यामुळेच कोल्हापूरची एक वेगळी ओळख निर्माण झाली. राजर्षी शाहू महाराजांचा संप्पन्न वारसा घेऊन आज समाजाला असलेली गरज ओळखून सर्वांच्या आग्रहास्तव विद्यमान अधिपती शाहू महाराज लोकसभेला उभे राहिले आहेत. शाहू महाराजांच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासासाठी होणार आहे. शाहू महाराज जनतेच्या मनातले उमेदवार आहेत. त्यांना संसदेत पाठवूया असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले. करवीरच्या पश्चिम भागातील सावर्डे दुमाला ते घानवडे तसेच शिरोली दुमाला ते गणेशवाडी (ता. करवीर) गावच्या दौऱ्याप्रसंगी केले. यावेळी सौ. तेजस्विनी राहुल पाटील सडोलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. तेजस्विनी राहुल पाटील सडोलीकर म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांनी अपूर्व कार्य केले आहे. छत्रपती घराण्याचे मोठे उपकार कोल्हापूरच्या जनतेवर आहेत. यां उपकाराची फेड आपण करु शकत नाही. पण येणाऱ्या लोकसभेला शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमदेवार म्हणून हात यां चिन्हावर निवडणुकीला उभे आहेत. लोकसभेला २५ वर्षानंतर पहिल्यांदा हात चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आम्हाला मताच्या रूपाने छत्रपती घराण्याच्या पाठीशी राहण्याचे मोठे सौभाग्य लाभले आहे. सर्वांनी शाहू महाराजांच्या विजयासाठी कामाला लागावे.
यावेळी संयोगिताराजे छत्रपती, सौ. तेजस्विनी राहुल पाटील सडोलीकर यांनी सावर्डे दुमाला, मांडरे, चाफोडी, गर्जन, आरळे, घानवडे, सडोली दुमाला, हिरवडे दुमाला, शिरोली दुमाला, गणेशवाडी, सावरवाडी गावांत झंझावती दौरा करून जनतेशी, खास करून महिलांशी संपर्क साधला.