आमदार पी. एन.पाटील यांचे दातृत्व : पुरस्काररुपी रकमेत स्वतःचे एक लाख घालून दोन लाखाची मदत सेवाभावी संस्थांना : भव्य नागरी सत्कार
करवीर :
काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांनी पुरस्काररुपी मिळालेले १ लाख व त्यामध्ये स्वतः १ लाख घालून एकूण 2 लाखाची रक्कम अवनि संस्थेला १ लाख आणि बालकल्याण संकुल व उमेद फौंडेशन संस्थेला प्रत्येकी ५० हजार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार पी. एन पाटील यांच्या दातृत्वाचे व त्यांच्या कार्याचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. तसेच
अवनी संस्थेच्या आवारात म. गांधीजींचे नातू अरुण गांधी यांच्या होणाऱ्या स्मारकाच्या कामातही पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.
बीडशेड (ता.करवीर) येथे पी.एन.पी. फौंडेशनतर्फे सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार मिळालेबद्दल आम. पाटील यांचा मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षस्थानी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील होते.
आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण तसेच १३२ विद्यार्थ्यांना पी.एन.पी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
आमदार पी.एन.पाटील पुढे म्हणाले, पी.एन.पी.फौंडेशनने विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम करण्याच्या दृष्टीने चालू केलेली शिष्यवृत्ती चांगले द्योतक आहे. पैसे मिळविणाऱ्या नव्हे तर गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षणसंस्थांची गरज आहे.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे व्ही.बी.पाटील म्हणाले, पी.एन.पाटील म्हणजे आदर्श नेतृत्व गुणांची खाण आहे. ते शब्दाचे पक्के आहेत. लोकसभा निवडणुकीच्या घडामोडीत पी.एन.पाटील यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांचे दातृत्व वाखानण्याजोगे आहे.
गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, आमदार पी.एन.पाटील यांच्या सभागृहातील मागणी व पाठपुराव्यामुळेच प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान मिळाले. पुरस्काराची रक्कम व त्यात स्वतःची रक्कम घालून समाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना देऊन या संस्थांच्या कार्यला उभारी देण्याचे, त्यांना बळ देण्याचे काम आमदार पी. एन. पाटील यांनी केले आहे.
यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, उत्तम पाटील यांची मनोगते झाली. स्वागत फौंडेशनचे अध्यक्ष प्रा.ए.डी.चौगले तर प्रास्ताविक धनाजी पाटील यांनी केले.
माजी जि.प. अध्यक्ष राहुल पाटील, भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र कवडे, सर्व संचालक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, क्रांतीसिंह पवार पाटील, बाजार समितीचे सभापती भारत पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर, गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे, शाहू काटकर, बजरंग पाटील, शामराव सूर्यवंशी, सत्यजित पाटील, यशवंत बँकेचे अध्यक्ष महेश पाटील, माजी सभापती पांडुरंग पाटील, शेतकरी संघाचे संचालक जी.डी.पाटील, पै.संभाजी पाटील, कुंभी कारखाण्याचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, सज्जन पाटील, बुद्धीराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
.