आनंदा जाधव यांची राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाच्या चिटणीसपदी निवड
कोल्हापूर :
बालिंगा (ता. करवीर) येथील सामाजिक कार्यकर्ते व शतकवीर रक्तदाता आनंदा गणपती जाधव यांची कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण )राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या चिटणीसपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या उपस्थितीत शहर अध्यक्ष आर. के. पोवार. यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी आमदार राजू आवळे, कार्याध्यक्ष अनिल घाडगे, करवीर तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, महिला जिल्हाध्यक्ष माने ताई, पंडीत कळके, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
शतकवीर रक्तदाता आनंदा जाधव. यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केल्याने त्यांच्या निवडीने परिसरात त्यांचे कौतुक होतं आहे.