‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
कोल्हापूरःता.२७. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेची सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ व अन्य सभासदांच्या सहकार्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली.
कर्मचारी पत संस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरु असल्यामुळे अनावश्यक निवडणूक खर्च टाळावा या उद्देशाने गेली १५ वर्ष कर्मचारी पत संस्थेची निवडणूक बिनविरोधची परंपरा कायम राखत यावेळी ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. सहकाराच्या माध्यमातून व कर्मचारी सभासदांच्या वाजवी गरजा नियमांच्या अधीन राहून पूर्ण करता आल्या पाहिजेत, सभासदांचे हिताचे निर्णय घेता आले पाहिजेत, या उद्देशाने कर्मचारी पत संस्था गेली ४६ वर्षाहून अधिक काळ पत संस्था अग्रेसर आहे. १४० कोटींचा वार्षिक उलाढाल असणारी नेट एनपीए सातत्याने ० टक्के ठेवणारी, सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळवणारी तसेच सभासदांना १३% लाभांश तसेच सर्व आधुनिक सुविधा कर्मचाऱ्यांना देणारी कर्मचारी पतसंस्था अशी या पतसंस्थेची ख्याती आहे.
सन २०२३-२८ या कालावधीकरिता बिनविरोध निवडून आलेले १३ संचालक मंडळ खालील प्रमाणे-
सर्व साधारण प्रतिनिधी – राजेंद्र विष्णुपंत चौगले, जयदिप जयवंत आमते, सचिन महादेव पाटील, गोविंद अर्जुना पाटील, रामचंद्र बापू पाटील, तुकाराम लक्ष्मण शिंगटे, पांडुरंग राजाराम कापसे, सुनिल दिनकर वाडकर, महिला प्रतिनिधी – माधुरी विनायक बसवर, गिता सचिन उत्तुरकर, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी – संदेश पांडुरंग भोपळे, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – सतिश पांडुरंग पोवार, भटक्या विमुक्त जमाती मागास प्रवर्ग प्रतिनिधी – दत्तात्रय पांडुरंग डवरी या सर्वांची निवड करण्यात आली.
या बिनविरोध निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो व आघाडीचे सर्व नेते मंडळी, यांचे तसेच संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर,किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील,राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले तसेच निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास, कर्मचारी पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर तसेच संघाचे अधिकारी, कर्मचारी संघटना प्रतिनिधी व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.