आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त : जिल्हास्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे पुईखडी येथे आयोजन ( ३ जानेवारीला स्पर्धेला प्रारंभ )
कोल्हापूर :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त के. एस. ईच्या मान्यतेने जिल्हास्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. करवीर पंचायत समितीच्या माजी सभापती अश्विनी धोत्रे व युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष कृष्णात धोत्रे यांच्या संयोजनातून ३ जानेवारीपासून पुईखडी (ता. करवीर) येथे यां स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
यावेळी बोलताना माजी सभापती धोत्रे म्हणाल्या, आमचे नेते आमदार पी एन पाटील सडोलीकर यांच्या ६ जानेवारी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त यां स्पर्धेचे आयोजन करत असून यावेळचे हे सलग नववे वर्ष आहे. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या अनेक विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ संघ व अन्य ठिकाणी चमकले आहेत. ग्रामीण खेळाडूना चालना व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.
स्पर्धेतील बक्षिसे ::
■ प्रथम क्रमांक : ९२९२ रुपये
■ द्वितीय क्रमांक : ६३६३ रुपये ,
■ तृतीय क्रमांक : ३६६३ रुपये
वरील बक्षीसासह सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, ‘भोगावती’चे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, महापालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, भोगावती कारखाना संचालक बी. ए. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम दिवशी आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.
या वेळी भोगावती कारखाना संचालक बी. ए. पाटील, कृष्णात धोत्रे, अक्षय केनवडे, जयकर टेळके, निखिल खोत, सुरेश टेळके, निलेश खोत आदी उपस्थित होते.