करवीर :
करवीर तालुक्यातील पाटेकरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी सुनीता बाजीराव पाटील, उपसरपंचपदी सचिन मारुती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी उपसभापती मारुती पाटील, माजी सरपंच विष्णुपंत पाटील, विष्णू नागोजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप कांबळे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती पाटील, सविता पाटील, जयश्री पाटील, गीता पाटील, पूनम पाटील यांच्यासह ग्रामसेवक संदीप पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नूतन उपसरपंच सचिन पाटील यांनी, आमदार पी.एन.पाटील, युवा नेते राजेश पाटील, जि.प.सदस्य राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहणार आहोत. अधिकाधिक कामे करण्याचा मानस असून सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचे सांगितले.