कै. जनाबाई पाटील स्मृतिदिन : आबाजींचे समाजकारण अनुकरणीय : मुख्यमंत्री सहाय्यता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांचे गौरवोदगार (मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्षाला २५ हजारांचा चेक प्रदान )

करवीर :

विश्वास पाटील (आबाजी) यांनी आईच्या स्मृतिदिनानिमित्त गेली १४ वर्षे सलगपणे  सामाजिक उपक्रम  घेऊन आईची आठवण चिरकाल ठेवली आहे. रक्तदान सारखे पवित्र कार्य यानिमित्ताने ते करत आहेत. एक रक्तदान ५ जनांचे जीव वाचवू शकते. त्याप्रमाणे ५०० जणांचे  रक्तदान २५०० जणांना जीवदान देऊ शकते. त्याचे  पुण्य आबाजींना तुम्हाला  लाभेल. राजकारण हा विषय थोडा बाजूला ठेवून सामाजिक उपक्रम प्रत्येक वर्षी कायम ठेवले आहेत. निश्चितच आबाजींचे समाजकारण अनुकरणीय आहे, असे गौरवोदगार  मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले. 

करवीर तालुक्यातील  शिरोली दुमाला गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वासराव नारायण पाटील यांच्या मातोश्री  श्रीमती जनाबाई नारायण पाटील यांच्या १४ व्या  स्मृतिदिनानिमित्त  रक्तदान शिबीर  व नेत्र तपासणी शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे  उदघाट्न प्रमुख पाहुणे

मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या झाले. यावेळी  गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील व तुकाराम पाटील यांच्या हस्ते  विश्वास नारायण पाटील फौंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी २५ हजारांचा धनादेश चिवटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

शिबिरास रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. महिलांचा सहभागही विशेष असा होता. सुमारे  ३५१ जणांनी रक्तदानाचे प्रवित्र कार्य केले. सर्व रक्तदात्यांचे स्वागत लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील, सुनिल पाटील, राहुल पाटील यांनी केले. नेत्रदान शिबिराचा शेकडो रुग्णानी लाभ घेतला. 

यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी या कक्षाच्या माध्यमातून कोणकोणते उपचार होतात, या योजनेतून अर्थसहाय्य कसे मिळवावे, अर्ज कसा करावा याविषयी सविस्तर माहिती दिली. शिबिरात

 कोल्हापूर वैद्यकीय कक्ष समन्वयक प्रशांत साळुंखे यांचे मनोगत झाले. वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. कार्यक्रमास गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे,  संचालक युवराज पाटील बापू, बाळासाहेब खाडे, अजित नरके, शशिकांत पाटील, अभिजित तायशेटे, किसन चौगले यांचेसह सर्व संचालक,  कुंभी कारखाना संचालक किशोर पाटील,  माधव पाटील, एस.के.पाटील, नंदकुमार पाटील, डॉ. आर.जी.अतिग्रे, उपसरपंच कृष्णात पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अर्पण व महालक्ष्मी ब्लड बँकेचे डॉक्टर, स्टाफ, ग्रामस्थ, तालुक्यातून आलेले नागरिक, समर्थक उपस्थित होते. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!