आमदार पी. एन.पाटील यांच्या फंडातून प्रयाग चिखली ते सोनतळी रस्ते कामाचा शुभारंभ
करवीर :
आमदार पी. एन.पाटील सडोलीकर यांच्या फंडातून मंजूर झालेल्या करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली ते सोनतळी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील, श्रीधर पाटील, शिवाजी कवठेकर, धनाजी चौगुले, उत्तम पाटील, प्रभाकर पाटील, केवलसिंग रजपूत, तुफेला मुल्लाणी, सचिन पाटील, जया यादव, अर्जुन पाटील, अनिल मांगलेकर, दिपक कुरणे, छाया पोवार यासह ग्रामस्थ उपस्थित होते.