कोगे येथे आमदार पी. एन.पाटील यांच्या फंडातून मंजूर रस्ते कामाचा शुभारंभ
करवीर :
कोगे (ता. करवीर) येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांच्या आमदार फंडातून हा रस्ता मंजूर झाला आहे.
यावेळी माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, सरपंच बनाबाई यादव, उपसरपंच नामदेव सुतार, कृष्णात पाटील, शिवाजी पाटील, करण पाटील, संतोष पाटील, संभाजी पाटील, आनंदा रामा पाटील, बळीराम चव्हाण, दादू रामा पाटील, बापू संतू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.