कसबा बीड येथे श्री बीडेश्वर महादेव मंदिर दीपोत्सवाने उजळले : यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड ‘ यांचे आयोजन
करवीर :
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्रिपुरारी पौर्णिमा आणि वैकुंठ चतुदर्शीचे औचित्य साधून ‘ यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड’ च्या माध्यमातून कसबा बीड गावचे ग्रामदैवत श्री बीडेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे ११०० पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. तसेच महात्मा जोतिबा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करणारी व त्यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी सुबक रांगोळी साकारण्यात आली होती. कसबा बीडच्या ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी विशेषतः महिला वर्गाने या दीपोत्सवास भेट देत त्याचा आनंद घेतला. हजारो दिवे, आकर्षक रांगोळी आणि लोकांचा सहभाग यांमुळे मंदिराचा परिसर चैतन्यमय बनला होता.