करवीर तालुक्यातील बीडशेड येथे शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन: उसाला दर मिळालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी आग्रही
करवीर :
करवीर तालुक्यातील बीडशेड येथील चौकात आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलना अंतर्गत चालू उसाला 3500 रुपये व मागील 400 रुपये दर मिळालाच पाहिजे या मागणीसाठी बीडशेड येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
करवीर तालुक्यातील कसबा बीड, शिरोली दुमाला, सावरवाडी, गणेशवाडी, बहिरेश्वर, महे यासह परिसरातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तासभर चाललेल्या या आंदोलनावेळी उसाला 3500 दर व मागील 400 रुपये मिळालेच पाहिजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, राजू शेट्टींचा विजय असो, आदी घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, कॉ.डी एम सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांच्या या लढ्याला बळ देण्यासाठी साथ देऊया. प्रत्येकाने गावागावात तोडणी बंद ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. जे कोणी तोडणी, ऊस वाहतूक करतील ते शेतकरी विरोधी असल्याचे समजू. त्यांना गांधीगिरी पद्धतीने गुलाब देऊ. शांततेत आंदोलनं सुरू आहे. त्यामुळे कुणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांना दरशेतकऱ्यांनी १ तास चक्काजाम आंदोलन केले. मिळवून देऊया असे आवाहन केले.
आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.