शिरोली दुमाला लोकनियुक्त सरपंच पदी आबाजींचा ‘ सचिन ‘ (आबाजी – किशोर पाटील गटाला ७, सरदार पाटील गटाला ५ जागा तर १ अपक्ष विजयी )
करवीर :
करवीर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या बनलेल्या शिरोली दुमाला ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष, विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी ) यांचे चिरंजीव सचिन पाटील लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले. सचिन पाटील यांना 2033 तर विरोधी उमेदवार तुळशी सहकार समूहाचे नेते सरदार पाटील यांना 1459 मते मिळाली. यां लढतीत सचिन पाटील यांनी 564 मताची आघाडी घेत विजयी हाशील केला.
शिरोली दुमाला ग्रामपंचायत निवडणूक ही अटीतटीची होती. जनसेवा ग्रामविकास आघाडीचे नेते गोकुळचे माजी अध्यक्ष व संचालक विश्वास पाटील आबाजी – कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील विरुद्ध लोकशाही ग्रामविकास आघाडीचे तुळशी समूहाचे सरदार शिवाजीराव पाटील व गजानन सुभेदार अन्य सहकारी अशी होती.
सरपंच पदासाठी सचिन पाटील विरुद्ध सरदार पाटील काटा लढत बनली होती. यात सरपंच पदी सचिन पाटील यांनी बाजी मारली.
अखेर जनसेवा ग्रामविकास आघाडीचे 7 उमेदवार विजय झाले, तर लोकशाही ग्रामविकास आघाडीचे 5 उमेदवार विजयी झाले. तर माजी पोलीस पाटील सुभाष पाटील यांच्या सुनबाई निता रणजित पाटील या अपक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. आबाजी गटाच्या सोनाबाई बाबू कांबळे यांची बिनविरोध निवड झाली होती.
विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
लोकनियुक्त सरपंच : सचिन विश्वासराव पाटील
प्रभाग क्रमांक 1:
शिवाजी धोंडीराम कांबळे, सौ.गौतमी रणजीत कांबळे, सौ.कविता भीमराव पाटील -कराळे.
प्रभाग क्रमांक 2 :
अरुण आनंदा पाटील, सौ. वैशाली धनाजी पाटील , सौ.गायत्री गजानन सुभेदार .
प्रभाग क्रमांक 3 :
सुशांत सर्जेराव पाटील,सोनाबाई बाबू कांबळे.
प्रभाग क्रमांक 4 : कृष्णात आनंदा पाटील, सौ.कल्पना दीपक कांबळे.
प्रभाग क्रमांक 5:
सागर वसंत घोटणे, सुरज नारायण पाटील, सौ.नीता रणजीत पाटील
फोटो -शिरोली दुमाला येथे विजयी उमेदवार व लोकनियुक्त सरपंच सचिन विश्वासराव पाटील, नंदकुमार पाटील, बलभीम विकास सेवाचे चेअरमन राहूल पाटील, माजी पं . स . समिती सदस्य सुनिल पाटील व आदी